खडसेंची घरवापसी २५ एप्रिलपूर्वी ?

0

24 प्राईम न्यूज 6 Apr 2024. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्यष्ठ नेते एकनाथ खडसे हे २५ एप्रिलपूर्वी भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्यास आपल्या कार्यकत्यांशी, सहकाऱ्यांशी तसेच सध्या असलेल्या पक्षाच्या नेत्यांना सांगून जाऊ असे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. असे असले तरी रावेर लोकसभा मतदारसंघात त्यांची सून रक्षा खडसे या भाजपा उमेदवार आहेत. त्यांची अर्ज दाखल करण्याची मुदत २५ एप्रिल असून मतदान १३ मे रोजी आहे. त्यांना प्रचारासाठी सहाय्य व्हावे यासाठी खडसेंना घाई करावी लागणार आहे. चाळीस वर्ष भाजपमध्ये घालवल्यानंतर तीन वर्षापूर्वी एकनाथ खडसेंनी भाजपची साथ सोडत शरद पवार यांच्याराष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधान परिषदेचे सदस्यत्व देत राजकीय पुनर्वसन केले. त्यांच्या कन्येला रोहिणी खडसेला महिला आघाडी प्रदेश प्रमुख केले. मात्र खडसे हे राष्ट्रवादीत रमले नाही. राष्ट्रवादीला देखील उत्तर महाराष्ट्रात विस्तारासाठी खडसेंचा उपयोग होईल, अशी अपेक्षा असतांना तसे घडले नाही. त्यांच्यामागे असलेल्या चौकशा आणि भेसरी भूखंड प्रकरण यात त्यांचा बराच वेळ गेला. आता त्यातून त्यांना दिलासा मिळाला असून भाजपात परतण्याचे वेध लागले आहेत. मध्यंतरी अचानक त्यांचा दिल्ल्ली दौरा झाला त्याबाबत आपण कोर्टाच्या कामासाठी गेलो होतो असे सांगत वेळ मारून नेली. मात्र त्यांच्या प्रवेशाचे मार्ग मोकळे झझाल्याचे सांगण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!