नेहरू युवा केद्रातर्फे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा.  -कबड्डीमध्ये जी.एस क्रीडा प्रबोधनिची बाजी, १00 मीटर धावणे स्पर्थेत तन्वी राजेंद्र पवार प्रथम.

0

अमळनेर |प्रतिनिधी

नेहरू युवा केंद्र जळगाव व जनसहयोग फौंडेशनतर्फे अमळनेर येथील जी.एस. विद्यालयाच्या प्रांगणात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. कबड्डी व 100 मीटर धावणे या प्रकारात स्पर्धा झाल्या. कबड्डीमध्ये जी.एस क्रीडा प्रबोधनी तर १00 मीटर धावणे स्पर्थेत तन्वी राजेंद्र पवार प्रथम आली.

स्पर्धेचे उद्घाटन जी.एस. विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. एस. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेती कुमारी सायली किरण बडगुजरसह ए.डी. भदाणे, एस. आर. शिंगणे आदी उपस्थित होते. दोन्ही स्पर्धामध्ये जवळपास ७० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. कबड्डीमध्ये प्रथम जी.एस क्रीडा प्रबोधनी, उपविजय शांती निकेतन विद्यालय ,तृतीय ग, स, कबड्डी संघ विजयी ठरले. १00 मीटर धावणे स्पर्थेत तन्वी राजेंद्र पवार प्रथम, रूपाली संदीप कोळी द्वितीय, शितल गोकुळ सैंदाणे तृतीय, सेजल प्रदीप ठाकूर चतुर्थ क्रमाक मिळाला. कबड्डीमध्ये आश्रम शाळा निंभोरा, जय क्रीडा मंडळ, ग. स. विद्यालय या संघांचा सहभाग होता. विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी, मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले. या स्पर्धा नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनात तर जनसहयोग फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन नेरकर व तालुका क्रीडा अध्यक्ष एस. पी. वाघ यांच्या नेतृत्वात पार पडल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!