गुढीपाडव्याला सोन्याचे दर नव्या शिखरावर ?प्रतितोळा दर ७३ हजारांवरून ७५ हजारांवर जाणार ?


24 प्राईम न्यूज 8 Apr 2024. सोन्याचे दर यंदाच्या वर्षी गुढीपाडव्याला नव्या शिखरावर जाऊन पोहोचण्याची चिन्हे वर्तविण्यात येत आहेत. अलीकडच्या काळात सोन्याचे दर झपाट्याने वाढत असून ते मंगळवारी, ९ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी प्रतितोळा थेट ७५ हजारांचा आकडा गाठण्याचा अंदाज जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सोन्याचे दर सध्या ७३ हजारांच्या घरात असून गुढीपाडवा तसेच लग्न सराईचे दिवस पाहता ते लवकरच ७५ हजारांचा दर गाठू शकतात, असे सराफव्यावसायिकांचे म्हणणे आहे लग्नसराई आणि सणासुदीच्या मुहूर्तावर सोन्याचे दागिने खरेदी करण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. त्यामुळे लग्नसराईच्या हंगामात किंवा सणासुदीच्या पवित्र मुहूर्तावर सोन्याचा दर वाढणे, ही बाब नवीन नाही, मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर झपाट्याने वाढत आहेत.
