फार वळवळ करू नकाअजित पवारांचा भावंडांना इशारा.

24 प्राईम न्यूज 10 Apr 2024

गुढीपाडव्याच्या निमित्ताने मंगळवारी बारामती येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजी- माजी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी भाषण करताना त्यांनी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचार करणाऱ्या भावंडांना इशारा दिला. माझ्या निवडणुकीत कधीच फिरली नाहीत इतकी गरागरा या निवडणुकीच्या निमित्ताने माझी भावंडे फिरत आहेत. निवडणुकीनंतर ते दिसणारही नाहीत. काही दिवसांनी ते हवाई सफर करत परदेशात निघून जातील. तेव्हा अजित पवार आणि त्यांचे कार्यकर्तेच लोकांचे प्रश्न सोडवणार आहेत, हे कुणीही विसरू नका. मी गप्प बसतोय याचा अर्थ तुम्ही फार वळवळ करू नका. मी तोंड उघडले तर तुम्हाला फिरता येणार नाही, असा इशारा अजितदादांनी भावंडांना दिला.
