‘मोदींची हमी म्हणजे दिशाभूल..’ उध्दव ठाकरे

24 प्राईम न्यूज 16 Apr 2024
भाजपने यापूर्वी दोन जाहीरनामे प्रसिद्ध केले. त्यातील आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. या निवडणुकीनंतर मात्र भाजप पुन्हा सत्तेत येणार नाही. भाजपचा जाहीरनामा म्हणजे देशवासीयांची दिशाभूल आहे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
पनवेलमधील भाजपचे चार माजी नगरसेवक व मनसेच्या चार पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. पनवेलमध्ये सिडको आणि पालिका वसूल करीत असलेला दुहेरी मालमत्ता कर महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर रद्दद केला जाईल, असे आश्वासन ठाकरे यांनी दिले. पनवेलमधील जनतेकडून दोन कर वसूल करणे हे धक्कादायक असून ही वसुली सरकारची जुलूमशाही आहे, असा संताप ठाकरे यांनी व्यक्त केला. सांगलीचा तिढा सुटलेला आहे.