दुबई पाण्यात डुबली दोन वर्षांचा पाऊस एका दिवसात.

0

24 प्राईम न्यूज 18 Apr 2024.

दुबई संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) वाळवंटात बुधवारी जोरदार पाऊस पडला. पावसाचा जोर इतका होता की, देशात सामान्यपणे दोन वर्षांत जितका सरासरी पाऊस पडतो तितका पाऊस एकाच दिवसात पडला. त्याने दुबईसह अन्य शहरे पाण्यात बुडाली. दुबईची अवस्था ‘डुबई’सारखी झाली होती.

बुधवारी बहरीन, ओमान, कतार आणि सौदी अरेबियातही पाऊस पडला. तथापि, संपूर्ण यूएईमध्ये पाऊस खूपच तीव्र होता. दुबईत वर्षाकाठी सरासरी ९४.७ मिमी पाऊस पडतो. मात्र, बुधवारपर्यंत २४ तासांत तेथे १४२ मिमी पाऊस पडला. यूएईच्या फुजैरा या अमिरातीत सर्वाधिक १४५ मिमी पावसाची नोंद झाली. पावसाने देशभरात पाणी साचले होते. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारा मार्ग पाण्याने भरून वाहत होता. अनेक वाहने पाण्यात अडकून तरंगत होती. नागरिकांची पुराच्या पाण्यातून वाट काढताना तारांबळ उडत होती. यूएईच्या रास-अल-खैमा येथे पुराच्या पाण्यात एका ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. पावसापूर्वी काही क्लाऊड सीडिंग करणारी (कृत्रिम पाऊस पाडणारी) विमाने हवेत उडाल्याचे दिसून आले. त्यांच्यामुळे पाऊस पडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!