अमळनेर मध्ये ईद उत्साहात साजरी; हजारो मुस्लिम बांधवांचे सामुदायिक नमाज पठण.

अमळनेर/ प्रतिनिधी
आज ईद-उल-अजहा-बकरी ईद सण मुस्लिम समाजाने मोठ्या उत्साहात, पारंपारिक पद्धतीने तसेच शांततेत साजरा केला. ईद-उल-अजहा बोरी नदी जवळ ईदगाह मैदानावर आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास झाला. यावेळी शहर परिसरातील सुमारे हजारो मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण केले.
यावेळी जामा मस्जिद चे ईमाम नौशाद आलम यांनी नमाज पठन केले व दुआ अजहर नुरी यांनी देशासह अमळनेरच्या प्रगतीसाठी तसेच शांतता अबाधित राहण्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात केलि. प्रशासन तर्फे सोयीसुविधा देण्यात आली व पोलीसांमार्फत चोख बंदोबस पार पाडण्यात आला. मुस्लिम बांधवांना ईद मुबारकच्या शुभेच्छा देण्यासाठी ईदगाह मैदानावर पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील नंदवाळकर , निरीक्षक विकास जाधव , उपनिरीक्षक सपकाळे , डॉक्टर अनिल शिंदे, संदीप घोरपडे, बी. के सूर्यवंशी, आदी मान्यवर उपस्थित होते. आलेल्या मान्यवरांचे ईदगाह कब्रिस्तान ट्रस्ट तर्फे शुभेच्छा व आभार व्यक्त करण्यात आला.