पोलीस उपअधीक्षक सोनवणे साहेब , सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे साहेब यांनी शुभेच्छा दिली.

दोंडाईचा /प्रतिनिधी रईस शेख
शहरातील ईदगाह मैदानावर आज सकाळच्या सुमारास सामूहिक नमाज पठण करून ईद साजरी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव नमाज पठणासाठी उपस्थित होते. नमाज पठणानंतर सर्वांनी एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या. मुस्लिम धर्मामध्ये रमजान सणानंतर बकरी ईद (ईद-अल-अज़हा) सणाला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. ईदनिमित्त शहरात सकाळी सात वाजेपासूनच ईदगाहकडे जाणाऱ्या मार्गावर नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम समाजातील नागरिकांची लगबग सुरू झाली होती. सामुदायिक नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी देशात राष्ट्रीय एकात्मता कायम रहावी, जातीय सलोखा व शांतता नांदावी यासाठी विशेष दुवा मागण्यात आली. ईदनिमित्त पोलिस प्रशासनाकडून ईदगाह मैदानावर व शहरात चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याप्रसंगी पोलीस उपअधीक्षक भागवत सोनवणे पोलिस शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश मोरे साहेब, पीएसआय नकुल कुमावत यांनी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.