‘प्रताप’ च्या दुर्गेश ठाकरे यांना सिल्व्हर मेडल :                                       10th नॅशनल रायफल अँड पिस्तोल शूटिंग चॅम्पियनशिप- 2024

0

अमळनेर /प्रतिनिधि. प्रताप कॉलेज(स्वायत्त),अमळनेर येथिल एम ए प्रथम राज्यशास्त्र या वर्गातील विद्यार्थी दुर्गेश रमेश ठाकरे यांनी गोवा-पणजी येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला होता. यात महाराष्ट्राच्या विविध वयोगटातील संघातून जळगाव जिल्ह्याचे प्रातिनिधित्व दुर्गेश ठाकरे व दीपक मोरे यांनी केले. या खेळाडूंनी इंडिव्हिज्युअल इव्हेंट्स मध्ये चांगल्या प्रकारे स्पर्धा खेळून दोघांनी प्रत्येकी दुसरा क्रमांक ( सिल्वर मेडल ) पटकावला. दुर्गेश ठाकरे सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे तर दीपक मोरे हा मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे. या यशाबद्दल प्रताप कॉलेजचे प्राचार्य डॉ.अरुण जैन,संस्थेचे सह चिटणीस डॉ.धिरज वैष्णव,डॉ.अमित पाटील,डॉ.विजय तुंटे,डॉ.व्ही.बी.मांटे, डॉ.एस.बी.नेरकर,क्रीडा संचालक सचिन पाटील,क्रीडा संचालक अमृत अग्रवाल,परीक्षा नियंत्रक प्रा.शशिकांत जोशी,ग्रंथपाल दिपक पाटील,डॉ.प्रदीप पवार,श्री.राकेश निळे,देवेंद्र कांबळे,विजय ठाकरे,धनराज मोरे,अजय साटोटे,मेहूल ठाकरे आदींनी अभिनंदन केले आहे. खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीचे कौतुक संघटनेचे पदाधिकारी श्री.प्रदीप तळवेलकर, श्री.चंद्रशेखर देसले, डॉ.देवदत्त पाटील,
श्री.नाना बागुल व एअर गन असोसिएशन ऑफ जळगावचे सेक्रेटरी
श्री.सचिन पाटील यांनी केले तसेच एअर गन असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सेक्रेटरी प्रा.लवकुमार जाधव व प्रा.सचिन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!