निम्न तापी प्रकल्प पाडळसरे प्रकल्पाचा लवकरच प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश करणार,दिल्लीतील हालचालींना वेग.            -केंद्रीय जलशक्ती मंत्री ना.सी.आर.पाटील यांची ग्वाही,,दिल्लीत झाली मंत्री अनिल पाटील व खा.स्मिता वाघांसोबत बैठक.

0

अमळनेर/प्रतिनिधी

अमळनेर-निम्न तापी प्रकल्प पाडळसरे प्रकल्पाच्या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील हे गेल्या साडेचार वर्षांपासून यशस्वी पाठपुरावा करून एक एक टप्पा पुढे सरकत असताना लवकरच या प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश करण्याची ग्वाही तथा संकेत केंद्रीय जलशक्ती मंत्री ना.सी.आर.पाटील यांनी मंत्री अनिल पाटील व नवनिर्वाचित खासदार स्मिताताई वाघ यांच्या सोबत दिल्लीत झालेल्या बैठकित दिले.
या यशस्वी बैठकीमुळे धरणाच्या प्रगतीचा मार्ग आता सुकर झाला आहे.निम्न तापी प्रकल्प पाडळसरे प्रकल्पाचा समावेश केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना (PMKSY-AIBP) या योजनेत होण्याबाबत पाठपुरावा म्हणून मंत्री अनिल पाटील दिल्लीत दाखल झाले होते.सुरवातीला एक दिवस आधी ना. सी. आर. पाटील हे केंद्रीय जलशक्ती मंत्री झाल्याबद्दल ना अनिल पाटील व नवनियुक्त खासदार स्मिताताई वाघ यांनी त्यांची भेट घेऊन सत्कार केला,त्यानंतर त्यांच्याच विनंतीनुसार दुसऱ्या दिवशी पाडळसरे प्रकल्पासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्री ना. सी.आर पाटील यांच्या समवेत बैठक पार पडली.यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी धरणाचा इतिहास मांडताना सदर प्रस्तावास यापूर्वी केंद्रीय जल आयोगाने (CWC) ची मान्यता देत १२ मार्च २०२४ रोजी Investment Clearance दिलेले असून या प्रकल्पाच्या टप्पा-१ चा समावेश PMKSY-AIBP या योजनेत होणेबाबत केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे शिफारस केलेली असल्याचे सांगीतले.तर स्मिता वाघ यांनी सांगितले की हे धरण अवर्षणप्रवण क्षेत्रात असून महाराष्ट्र शासनाने यास चौथी सुप्रमा देऊन केंद्राचा मार्ग सुकर केला आहे तर केंद्र शासनाने सी डब्लू सी ची मान्यता दिली आहे.आता केंद्रीय योजनेत धरणाचा समावेश होण्याची आम्हाला प्रतीक्षा असल्याचे सांगितले.त्यानंतर सी.आर. पाटील यांच्या सोबत याविषयी अतिशय सकारात्मक चर्चा झाली.त्यावर ना सी. आर. पाटील यांनी निम्न तापी (पाडळसे) प्रकल्पाबाबतची कार्यवाही तातडीने पूर्ण करून (PMKSY-AIBP) योजनेमध्ये समाविष्ट करण्याबाबत लवकरच अंतिम मंजुरी देण्यासंदर्भात निर्देश विभागाच्या सचिव व इतर अधिकाऱ्यांना दिलेत,या सकारात्मक भूमिकेबद्दल मंत्री अनिल पाटील व खा.स्मिता वाघ यांनी सी आर पाटील यांचे विशेष आभार व्यक्त केले.
सदर बैठकीस जलशक्ती विभागाच्या केंद्रीय सचिव श्रीम.देबाश्री मुखर्जी, पाणी पुरवठा-स्वच्छता विभाग सचिव श्रीम.विनी महाजन तसेच जलशक्ती विभाग आयुक्त ए.एस.गोयल उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!