रोहित शर्माने वर्ल्ड कप स्विकारताना कोणाची स्टाइल मारली, समोर अली आता खरी हकीकत.

24 प्राईम न्यूज 1 Jul 2024. रोहित शर्मा भारताने वर्ल्ड कप जिंकल्यावर एक खास स्टाइल मारली. जय शाह यांच्याकडून वर्ल्ड कप स्विकारताना रोहितने खास शैलीत चालत आला आणि त्याने वर्ल्ड कप स्विकारला. पण रोहितने ही स्टाइल कोणाची कॉपी केली, ते आता समोर आले आहे.
भारताने फायनलचा सामना जिंकला आणि त्यानंतर सर्वांनाच उत्सुकत होती ती रोहित शर्माच्या हातात वर्ल्ड कप कधी येणार. वर्ल्ड कप जिंकल्यावर खेळाडूंना प्रथम मेडल्स देण्यात आले. त्यानंतर जय शाह हे वर्ल्ड कप घेऊन व्यासपीठावर उभे होते. भारतीय खेळाडूही तिथे दाखल झाले होते. पण रोहित मात्र तिथे आला नव्हता. रोहित व्यासपीठा जवळ दाखल झाला तो एका खास स्टाइलमध्ये. त्यावेळी कोणालाच समजले नाही की, रोहित कोणती ही खास स्टाइल मारत आहे. रोहितने खास स्टाइलमध्ये वर्ल्ड कप स्विकारला आणि त्यानंतर जोरदार सेलिब्रेशन सुरु झाले. त्यानंतर रोहितने या स्टाइलमध्ये वर्ल्ड कप का स्विकारला, याचा विचार चाहते करत होते. पण आताही गोष्ट समोर आली आहे. रोहित हा फक्त क्रिकटपटूंचा चाहता नाही, तर नोव्हाक नरजोकोव्हिचसारखं त्याने पीचवरचं गवत विजयानंतर चाखलं होतं. त्यानंतर आता- 1 दिग्गज फुटबॉल खेळाडूच्या स्टाइलमध्ये त्याने विश्वचषक स्विकारला आहे.रोहित शर्मा हा नोव्हाक जोकोव्हिचबरोबर महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा चाहता आहे. मेस्सीने जेव्हा वर्ल्ड कप जिंकला होता, तेव्हा त्याने अशीच स्टाइल मारली होती. हीच स्टाइल आता रोहितने वर्ल्ड कप जिंकल्यावर मारल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण रोहितच्या या स्टाइलचा फोटो व्हायरल होत असताना मेस्सीचाही वर्ल्ड कप जिंकल्यानंतरचा फोटो व्हायरल झाला आहे. त्या फोटोमध्ये मेस्सी हा अशीच स्टाइल मारत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे रोहितने त्याचीच स्टाइल यावेळी वर्ल्ड कप स्विकारताना मारली आहे.