विधानसभा जिंकणे हेच मविआचे लक्ष्य-शरद पवार

24 प्राईम न्यूज 1 Jul 2024
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे अध्यक्ष शरद पवार यांनी टी-२० वर्ल्ड कपमधील टीम इंडियाच्या विजयाचे रविवारी कौतुक केले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधताना राजकीय भाष्यदेखील केले. १८व्या लोकसभेत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. भाजपप्रणित एनडीए आघाडीकडे बहुमत असल्यामुळे त्यांनी सत्ता स्थापन केली आहे. या आघाडीतील नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू नाराज असल्याची चर्चा आहे. त्याबद्दल माहीत नसल्याचे सांगत शरद पवार म्हणाले की, नुकतीच निवडणूक झाली आहे. खासदारांना आता निवडणूक नको. महाविकास आघाडीचे सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जिंकणे है एकमेव लक्ष्य असल्याचेही पवार म्हणाले.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी कोणाचा चेहरा समोर ठेवून निवडणुका लढणार, या प्रश्नाच्या उत्तरात शरद पवार म्हणाले, आम्ही आधीच स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणूक आम्ही तिन्ही पक्ष सामूहिक नेतृत्वात लढणार असल्याचे शरद पवार म्हणाले.