लाडकी बहीणसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज. -वयोमर्यादा ६० वरून ६५ वर्षे, शेती, अधिवासाची अट वगळली..

0

24 प्राईम न्यूज 3 Jul 2024. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय मंगळवारी राज्य सरकारने जाहीर केला. या निर्णयानुसार योजनेसाठी असलेली पात्र लाभार्थ्यांची कमाल ६० वयोमयदिची अट आता ६५ वर्षे इतकी करण्यात आली आहे. तसेच ५ एकर शेती आणि अधिवास प्रमाणपत्राची अटसुद्धा योजेतून वगळण्यात आली आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत १५ जुलै २०२४ अशी होती. आता ही मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या पात्र महिलांना पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे १ जुलै २०२४ पासून योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने महिलावर्गाला आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा गेल्या आठवड्यात विधिमंडळात सादर केलेल्या सन २०२४- २५च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात केली होती. ही घोषणा होताच सरकारने घाईघाईने शासन निर्णय जारी केला होता. शासन निर्णयातील अटींवर विरोधी पक्षाकडून टीका होत असताना मंगळवारी विधान भवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेतया योजनेसाठी नाव नोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. त्यानुसार ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना १ जुलैपासून लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतानाच योजना सुलभ आणि सुटसुटीतपणे राबवण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिले आहेत. योजनेसाठी शेतीची अट वगळण्याचा, लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्षे वयोगटाऐवजी २१ ते ६५ वर्षे वयोगट करण्याचा, परराज्यात जन्मलेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!