आज विश्वविजेत्या टीम इंडियाचे आगमन मरीन ड्राईव्हवर विजयी मिरवणूक.

24 प्राईम न्यूज 4 Jul 2024.
टीम इंडियाने टी-२० विश्वचषक २०२४ चे जेतेपद पटकावत आयसीसी ट्रॉफीचा ११ वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेत २९ जून रोजी बार्बाडोस येथे अंतिम लढत झाली होती. या लढतीनंतर कॅरेबियन बेटावरील बेरिल वादळामुळे भारतीय संघ ३ दिवस बार्बाडोसमध्येच अडकला होता. देशवासीय भारतीय संघाचे स्वागत करण्यास आतुर झाले असताना बीसीसीआयने टीम इंडियासाठी खास चार्टर्ड विमानाची व्यवस्था केली आहे. या विमानाने भारतीय संघ बुधवारी दुपारी मायदेशी यायला निघाला आहे. आज गुरुवारी भारतात परतल्यानंतर भारतीय संघ दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेईल. तिथून मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे विश्वविजेत्या संघाची विजयी परेड निघेल.• टीम इंडिया गुरुवारी पहाटे दिल्लीत दाखल होईल.
- सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेईल.
- मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी विजयी परेड
वानखेडेवर १२५ कोटींचे बक्षीस टीम इंडियाला मिळेल.