विविध स्तरावर उत्कृष्ट विमा व्यवसाय व विमा सेवा देणे तसेच विमा क्षेत्रात झालेले बदलांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी महामेळाव्याचे आयोजन.

अमळनेर /प्रतिनिधी.
ऑल इंडिया लाइफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या नाशिक डिव्हिजन च्या माध्यमातून अमळनेर येथे विमा प्रतिनिधींचा मेळावा 2 जुलै रोजी प्रताप काँलेज येथिल तत्वज्ञान केंद्रामध्ये संपन्न झाला
. विमा प्रतिनिधींना विविध स्तरावर उत्कृष्ट विमा व्यवसाय व विमा सेवा देणे संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी तसेच विमा क्षेत्रात झालेले बदलांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी महामेळाव्याचे आयोजन केले होते. या महामेळाव्यासाठी मार्गदर्शक म्हणून पश्चिम क्षत्रिय अध्यक्ष पाध्ये साहेब यांनी विमा प्रतिनिधी यांना असणारे संघटनेची गरज ,संघटना व विमा प्रतिनिधी यांचे नाते याबाबतीत विस्तृत मार्गदर्शन केले तसेच नाशिक डिव्हिजन कौन्सिल अध्यक्ष कैलास जी चव्हाण यांनी विमा प्रतिनिधींना संघटित राहण्या विषयी मार्गदर्शन केले, डिव्हिजन सचिव पद्माकर साळुंखे यांनी लिया फी संघटनेचा नाशिक विभागाचा व अमळनेर शाखेचा लेखाजोखा यावेळी प्रस्तुत केला तसेच इसी मेंबर किरण पाटील साहेब यांनी विमा प्रतिनिधींना वेगवेगळ्या स्तरावर असणारे त्यांचे हक्क व अधिकार याविषयी, विविध क्लब मेंबर विषयी मोलाचे मार्गदर्शन केले महामेळाव्याचे उत्कृष्ट असे सूत्रसंचलन माजी डिव्हिजनल अध्यक्ष सुनील जी पाटील यांनी केले ह्या मेळाव्यासाठी दोंडाईचा धुळे सावदा जळगाव येथील विमा प्रतिनिधी तसेच अमळनेर शाखेतील असंख्य विमा प्रतिनिधी उपस्थित होते पूर्ण भारतभरातून असलेल्या तीस लाखापेक्षा जास्त असणारे विमा प्रतिनिधींचे,प्रतिनिधित्व त्यांचे अडचणी, समस्या अधिकार , भारत सरकार पर्यंत पोहोचवण्यासाठी विमा प्रतिनिधींच्या माध्यमातून राज्यसभेवर क्षेत्र वाईज चार ते पाच खासदारांची नेमणूक करावी हा न भूतो न भविष्य तो असा ठराव व चर्चा या महामेळाव्यात करण्यात आले यावेळी अमळनेर शाखेचे अध्यक्ष अनिल वाणी. सचिव कुंदन पवार खजिनदार ज्ञानेश्वर पाटील, उपाध्यक्ष,नरेंद्र पाटील, राजेंद्र महाजन,,संघटक अनिल जाधव, संजय चौधरी, महिला संघटक श्रीमती सुनंदा चौधरी, श्रीमती छाया पाटील,सदस्य मोहन वाडकर,राजेंद्र कोठावदे,विलास पाटील,सिताराम पाटील, उमेश चौधरी, गंभीर महाजन, यांच्या सह आदि विमाप्रतिनिधी उपस्थित होते.