अमळनेरमध्ये भास्कर पारधी यांनी इमानदारीने केले सोनं आणि चांदी परत..

अमळनेर/प्रतिनिधी
अमळनेर तालुक्या जवळ असलेले गांधली पिळोदा रस्ता लगत असलेल्या सप्तशृंगी मंदिरजवळ एका व्यक्तीला ५० हजारांची रक्कम आणि ६ ग्रॅम सोन्याचे टोंगल असलेला डबा मिळाल्यानंतर त्याने इमानदारी दाखवून त्याचे मालक शोधून काढले आणि त्यांना परत केले आहे.
भास्कर पारधी नावाच्या या व्यक्तीला मंगळवारी दुपारी हे सामान मिळाल होते. ते डबा उघडून पाहिल्यावर त्यात ६ ग्रॅम सोन्याचे टोंगल आणि ३ बार चांदी असल्याचे दिसून आले. तपास केल्यानंतर हे सोने आणि चांदी नंदगाव येथील भारती प्रवीण पाटिल यांचे असल्याचे निश्चित झाले.त्यानंतर भास्कर पारधी यांनी भारती पाटिल यांना संपर्क साधून त्यांना हे सामान परत केले. भारती पाटिल यांनी भास्कर पारधी यांच्या इमानदारीची प्रशंसा केली आणि त्यांचा सत्कार केला.
भास्कर पारधी हे पत्रकार गणेश चव्हाण यांचे मावस भाऊ आहेत.
भास्कर पारधी यांनी दाखवलेली इमानदारी निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कृतीमुळे समाजात सकारात्मक संदेश गेला आहे.