राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेश पाटील यांना विधानसभेची उमेदवारी मिळू शकते. -अमळनेर विधानसभा कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याचा शरद पवारांचा निर्धार.

अंमळनेर/प्रतिनिधि. राष्ट्रवादी ग्रंथालय सेलचे राज्य प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांना राष्ट्रवादी पक्षातर्फे (शरद पवार गट) तिकीट मिळण्याची शक्यता असून ते अमळनेर विधानसभा मतदार संघाचे संभाव्य उमेदवार असू शकतात. उमेश पाटील यांना खुद्द राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ६ जुलै रोजी बारामती येथे स्नेह भोजनाचे आमंत्रण दिले असल्याचे खात्रिलायक वृत्त आहे.मुंबईत एका ठिकाणी शरद पवार आणि उमेश पाटील यांची भेट झाली. अमळनेरची उमेदवारी करणार का? असा प्रश्न शरद पवारांनी उमेश पाटलांना विचारला असता आपण आदेश दिला तर नक्कीच निवडणूक लढेल, असा होकार दर्शविला. विशेष म्हणजे या विधानाला रोहित पवारांनीही सकारात्कता दर्शविली. ६ जुलै रोजी महाराष्ट्रातील निवडक संभाव्य उमेदवारांना बारामती येथे शरद पवारांच्या घरी स्नेह भोजनाचे आमंत्रण असून त्यात उमेश पाटलांनाही आवर्जून बोलविले आहे. याच ठिकाणी आगामी विधानसभेच्या निवडणुकीबद्दल तसेच उमेदवारीबद्दल चर्चा होणार असून उमेश पाटील यांची अमळनेर विधानसभेची उमेदवारी मिळू शकते.