जगातील पहिली सीएनजी बाईक लॉन्च..

24 प्राईम न्यूज 6 Jul 2024.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी जगातील पहिली सीएनजी बाईक लॉन्च करण्यात आली. पिंपरी- चिंचवडमध्ये हा कार्यक्रम झाला. बजाज कंपनीने बनवलेली ही सीएनजी बाईक पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही प्रकारच्या इंधनावर धावणारी हायब्रीड बाईक आहे. या बाईकमध्ये २ किलो सीएनजीची टाकी बसवण्यात आली आहे. वाहन उद्योग क्षेत्रात जगात सातव्या स्थानी असलेला भारत आता जगात तिसऱ्याा क्रमांकावर पोहचल्याची माहितीही नितीन गडकरी यांनी दिली.