18 गरजू,होतकरू व गरीबविद्यार्थ्यांना-अमळनेर क्लासेससंघटनेने(PTA)घेतले दत्तक.

0

अमळनेर /प्रतिनिधी

अमळनेर-सोमवार,दि.8 जुलै रोजी प्रति वर्षाप्रमाणे एक सामाजिक बांधिलकी म्हणून अमळनेर
तालुक्यातील वेगवेगळ्या शाळेतील18 गरजू, होतकरू व गरीबविद्यार्थ्यांची अमळनेर क्लासेससंघटनेने(PTA)उचलली शैक्षणिक
जबाबदारी.सदरील विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थ्यांचे पितृछत्र हरपलेले आहे सर्वच विद्यार्थी अमळनेर येथील महाविद्यालय,विद्यालय येथे शिक्षण घेतात.कल्याणी भोई(इ.8वी),गौरव
चव्हाण(इ.8वी),नितू भोई(इ.6वी), आदित्य तायडे(इ.8वी), तनिष्का तायडे(इ.11वी),उत्कर्षा उपासनी (इ.12 वी), लोकेश पाटील(इ.9 वी),
रोहिणी पाटील(इ.10वी),दिव्या पाटील (इ.9वी),रोहित कोळी(इ.9वी), यश पाटील( इ.10वी),दुर्गेश दिघे (इ.9वी),हिमेश पाटील(इ.9वी), कु.इशिका कालोसे(इ.9वी ), मनीषपाटील(इ.12 वी), कु.सुप्रिया पाटील
(इ.9वी),रितेश पाटील(इ.7वी),कुणाल पाटील(इ.8वी) सदरील विद्यार्थ्यांना एका वर्षभरासाठी फ्री कोचिंग देण्यात येईल- सदरील विद्यार्थ्यांकडून क्लास फी चे कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही व वर्षभरसर्वांना शैक्षणिक साहित्य देण्यात येईल अशी अधिकृत घोषणा मा.महादेव खेडकर साहेब-उपविभागीय अधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी अमळनेर भाग,अमळनेर.यांच्या कार्यालयात क्लासेस संघटना(PTA) अध्यक्ष-भैय्यासाहेब मगरयांनी केली.यावेळी मा.महादेव खेडकर साहेब यांच्या हस्ते सदरील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले.PTA संघटने मार्फत सातत्याने
होत असलेल्या समाज उपयोगी कार्याची नोंद शासन दरबारी व्हावी अशी विनंती यावेळी संघटने मार्फत प्रांत महोदयांना करण्यात आली.
यावेळी क्लासेस संघटना(PTA) अध्यक्ष-भैय्यासाहेब मगर ,विनोद जाधव , किरण माळी ,राकेश बडगुजर , सुरश्री वैद्य ,
सुधीर टाकणे , शर्मिला बडगुजर ,
सोनल जोशी, धिरज पवार ,स्वाती पाटील , परेश गुरव ,सुनिल पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!