माजी आमदार अनिल अण्णांच्या विकास कामांवर प्रेम करणाऱ्या धुळे अल्पसंख्यांक समाजातील कार्यकर्त्यांचा लोकसंग्राम मध्ये पक्षप्रवेश.

धुळे/प्रतिनिधी. रविवार दिनांक ७ जुलै २०२४ रोजी लोकसंग्राम वर व कार्यसम्राट माजी आमदार अनिल अण्णांच्या विकास कामांवर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांची कल्याण भवन येथील लोकसंग्राम च्या कार्यालय येथे बैठक पार पडली सदर बैठकीमध्ये लोकसंग्रामच्या अल्पसंख्यांक विभागाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अकबर अली सय्यद सर तथा धुळे शहराध्यक्ष सलीम भाई शेख व आबिद मणियार यांच्या माध्यमातून अल्पसंख्यांक विभागातील रफिक भाई पंपवाले, के. एम. पठाण, आसिफ भाई टायरवाले, जावेद भाई मिस्त्री, शकील मण्यार,इस्रार मन्यार, नुरुद्दीन शेख, फकीर शेख, मुजफ्फर मंसूरी व महिलांचे पक्षप्रवेश करण्यात आले. अशी माहिती लोकसंग्रामच्या अल्पसंख्यांक विभागाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अकबर अली सय्यद सर यांनी दिली व प्रसिद्धी प्रमुख अविनाश लोकरे यांनी प्रसिद्ध केली.