पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे लिनेस क्लब तर्फे वृक्षारोपण.

अमळनेर/प्रतिनिधी
पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे आज लिनेस क्लब अमळनेर तर्फे वृक्षारोपण प्रेसिडेंट सौ. नम्रता हिंदुजा , सौ. कांचन शहा , सौ. परमिंदर कालरा , यांच्या हस्ते करण्यात आले, लिनेस क्लब सदस्य सौ. जेस्मिन भरुचा (Micro Cabinet Officer Education) यांच्या कडून 5 विद्यार्थ्यांना स्कूल गणवेश तसेच सर्व विद्यार्थ्यांना खाऊ, वही पेन भेट वस्तू देण्यात आले तसेच शिक्षकांना पेन देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चेअरमन श्री चंद्रकांत भदाणे सर हे उपस्थित होते. प्राचार्या यांनी फुल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या सत्कार केला. प्रास्ताविक कुमारी प्रज्ञा पाटील मॅडम, यांनी केले, पर्ल इंटरनॅशनल स्कूल चा विद्यार्थी साई चौधरी व विद्यार्थीनी कुमुद मगर यांनी सन्मानिय पाहुण्यांचे आभार मानले, कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री विजय चौधरी सर, मनस्वी भदाणे , विशाखा देसले मॅडम, कुंजल पाटील मॅडम, श्री सखाराम पावरा, श्री उमेश पाटील, राजू पाटील यांनी सहकार्य केले