खान्देश शिक्षण मडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह सत्कार.

अमळनेर/प्रतिनिधी. अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात मार्च 24 मध्ये झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेतील गुणांनुक्रमे शाखा निहाय प्रथम पाच विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा दिनांक सात जुलै रोजी साने गुरुजी सभागृहात खान्देश शिक्षण मंडळाचे कार्य उपाध्यक्ष नीरज अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख, विश्वस्त वसुंधरा लांडगे, ज्येष्ठ संचालक तसेच शल्य विशारद डॉ. अनिल शिंदे खान्देश शिक्षण मंडळाचे सचिव व प्राचार्य डॉ. अरुण जैन इ. उपस्थित होते.
गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला तसेच पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
गुणवंत विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. जैन, डॉ. अनिल शिंदे,कार्य उपाध्यक्ष नीरज अग्रवाल, यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाचे उप प्राचार्य प्रा. उल्हास मोरे यांनी केले. सूत्रसंचालन पर्यवेक्षक प्रा. डी व्ही भलकार यांनी केले. आभार पर्यवेक्षक सीबी सूर्यवंशी यांनी केले. यावेळी प्राध्यापक बंधू भगिनी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.