प्रकाश (भाई) पाटील युवामंचातर्फे अमळनेर तालुक्यातील 150 तरुणांना नोकरी.                   -आधी केले मग सांगितले : टप्प्याटप्प्याने सुमारे 3 हजार जणांना मिळणार रोजगार

0

अमळनेर/प्रतिनिधी

सध्याची बेरोजगारीची परिस्थिती पाहता मायभूमीतील तरुणांना रोजगार प्राप्त व्हावा या उद्देशाने प्रकाश (भाई) पाटील युवामंचातर्फे अमळनेर तालुक्यातील 150 बेरोजगार तरुणांना नोकरी देण्यात आली. आगामी काळात टप्प्याटप्प्याने पेपर मेकिंग कंपनी व गारमेंट इंडस्ट्रीज तसेच ऑनलाइन सर्व्हिसेसमध्ये सुमारे 3 हजार तरुण-तरुणींना रोजगार देण्यात येणार असल्याचे मंचाचे संस्थापक प्रकाश (भाई) पाटील यांनी सांगितले.
सर्वत्र बेरोजगारीची परिस्थिती पाहता तरुणांमध्ये नैराश्य निर्माण झाले आहे. बरेच तरुण कौटुंबिक अडचणींमुळे बाहेरगावी रोजगारासाठी जाऊ शकत नाहीत. ही निकड लक्षात घेता तालुक्यातील तरुण-तरुणींना तालुक्याच्या ठिकाणी रोजगार मिळावा यासाठी प्रकाश पाटील यांनी नुकतीच पेपर मेकिंग कंपनी स्थापन केली. गेल्या आठवड्यात तालुक्यातील काही तरुणांनी नोकरीसाठी मुलाखती दिल्या होत्या. पैकी 65 जणांना 10 जुलै रोजी कंपनीतील कामाचे स्वरुप समजावण्यात आले. उर्वरित 85 जणांच्या 13 रोजी मुलाख्ाती घेत नोकरीवर घेतले जाईल. असे एकूण 150 जणांना नोकरी दिली असून त्यांचा रोजगाराचा प्रश्न सोडला आहे.
हेडावे रस्त्यालगत असलेल्या या कंपनीत येत्या एका वर्षात टप्प्याटप्प्याने तालुक्यातील सुमारे 3 हजार तरुण-तरुणींना रोजगार दिला जाणार असल्याचे प्रकाश (भाई) पाटील यांनी सांगितले. ही नोकरी कायमस्वरुपी असून नोकरी मिळविणाऱ्या तरुणांचा कंपनीतर्फे 5 लाखाचा विमादेखील काढला जाणार आहे. शिवाय कंपनी ॲक्टनुसार सर्वप्रकारच्या सुविधाही दिल्या जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!