इमारतीवरून तोल गेल्याने खाली पडून तरुणाचा मृत्यू.

अमळनेर/प्रतिनिधी
अमळनेर इमारतीच्या तिसरा मजल्यावर वेल्डिंगचे काम करत असताना तोल जाऊन खाली पडल्याने २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी १२ वाजेच्या सुमारास आर. के. नगर परिसरात घडली.
शाहिद सादिक शेख (वय २४) असे मयताचे नाव आहे. काम करताना तोल गेल्याने तो खाली पडला. त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केले. शाहिद याची प्रकृती बरी नसल्याने तो घरी आराम करत होता. मात्र मोठा भाऊ शाकीर याला पाण्याची बाटली देण्यासाठी तो गेला होता मात्र भावाला मदत करण्यासाठी त्याने काम सुरु केले. त्या वेळी तो खाली पडला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.