मनमाड इंदूर रेल्वेमार्गाला मंजुरी. -आर्थिक तरतुदीसाठी फाईल अर्थमंत्रालय आणि पीएमओ ऑफिसला पोहचली. -माजी आ. अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केला मोठा दावा.

धुळे/प्रतिनिधी. रेल्वे बोर्डाकडून व नियोजन आयोगाकडून मंजूरी नंतर धुळे, मालेगाव जनतेचे शतकाचे स्वप्नसाकार । अनिल अण्णांनी कुठलीहि सत्ता नसतांना गेली पाच वर्षे या कानाची खबर त्या कानाला लागू न देता, कुठलीही वाच्यता न करता माननीय नितीनर्जीच्या मार्गदर्शनखाली न थकता गंभीर आजार असतांना सुध्दा आणि परिश्रम घवून 45 वर्षापूर्वीचा शब्द खरा केलाच लोकसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष व कार्यसम्राट शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माननीय अनिल अण्णांनी 1979 मध्ये साक्री रोड वरील कै. शरद जोशींच्या नेतृत्वाखालील प्रचंड जाहीर सभेत सटाण्यापासून शिरपूर पर्यतच्या शेतकऱ्यांना शब्द दिला होता की, मनमाड धुळे, नरडाणा, शिरपूर सेंधवा, धामणोद, महू इंदोर हा तिनशे साठ किलोमिटर्स रेल्वे मार्गाची मी पूर्तता करेन ! तेव्हापासून आजतागायत मनमाड मालेगाव धुळे इंदोर रेल्वे मार्ग राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर आला. पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेल्या सर्वच पक्षाच्या नेत्यांनी ज्या-ज्या वेळेस निवडणूक प्रचारासाठी धुळ्यात पायधूळ झाडली तेव्हा-तेव्हा आमचे सरकार आले की, आम्ही हा रेल्वेमार्ग करूच असे तोंड फाटेस्तोर आश्वासन दिले. पण एकाही पंतप्रधानांनी खुर्चीवर बसल्यानंतर मनमाड इंदोर रेल्वे मार्गाची साधी आठवण सुध्दा काढली नाही. धुळेकरांचे दुर्दैव अजून काय ? माननीय अनिल अण्णांनी मनमाड इंदोर रेल्वे मार्गाचा ध्यासच घेतला होता. कै. प्रमोद महाजन, कै. गोपीनाथ मुंडे साहेब मंत्री असतांना परळी-बीड- अहिल्यानगर (अहमदनगर) तसेच शरद पवारांनी पुणे-बारामती लोणंद यारेल्वे मार्गाचे कुठलेही सर्वेक्षण फायद्याचे नसतांना तोट्यातील रेल्वेमार्ग मंजूर करून घेवून पुर्णत्वास नेले आहेत. या पार्श्वभूमीवर मनमाड-इंदोर रेल्वेमार्ग फायद्याचे नसल्याचे कारणे सांगून मागणी करणाऱ्यांची बोळवण करून वाटेला लावून देत असत. महाराष्ट्रातील सर्वच पक्षाच्या नेत्यांनी हा मार्ग होवूच शकत नाही. असा शिक्काच मारून टाकला. केंद्रातील मंत्री काही बोलण्यापूर्वीच आपलेच शुकाचार्य झारीत अडकून बसले होते. अपवाद केवळ माननीय नितीन गडकरी साहेब हे एकच होते व आहेत. त्यांच्या परिश्रमामुळे व पाठींब्यामुळेच आजचा सुवर्ण दिवस उजाडला आहे.
मनमाड-मालेगाव-धुळे-नरडाणा-शिरपूर-सेंधवा-धामनोद-महू-इंदोर रेल्वेमार्ग झालाच पाहीजे अशी जबरदस्त राजकीय इच्छाशक्ती नसलेल्या नेत्यांनी रेल्वे मार्ग होवू नये यासाठी केलेल्या प्रयत्नांपेक्षा नुसते शांत बसले असते. तरी दहा वर्षापूर्वीच रेल्वेमार्ग पूर्ण झाला असता. दहा वर्षापासून खासदार पदाची खुर्ची उबवण्या व्यतिरिक्त डॉ सुभाष भामरे यांनी निधीचे बोगस खोटे आकडे तोंडावर फेकून विरोधकांना गप्प केले. त्यांचे सर्वात मोठे कार्य म्हणजे टक्केवारी संस्कृती जन्माला घातली आणि वृध्दींगत केली. ही वस्तुस्थिती आहे. मा. सुरेश प्रभू साहेब हे रेल्वेमंत्री असतांना एक सुवर्ण संधी आली होती. पण या करंट्या माणसाच्या खानदानांत एकानेहि विकास काम केलेले नाही. नकारात्मक व सत्यानाशी डी.एन.ए असलेल्या खासदारांना ऐवढे मोठे काम मंजूर करून घेणे पचणारे नव्हते. प्रभू साहेबांनी रक्षा बंधनाची भेट दिली. भाउबीजेची भेट दिली असल्या बालिश घोषणा करून आपल्याच मतदारांची फसवणूक करून वारंवार आपल्या बालिशपणाच्या अज्ञानाचे निर्लज्ज प्रदर्शन घडवीत होते. लबाडी, खोटेपणा व समोरच्याला मूर्ख समजून बोरविहिर नरडाणा हा मार्ग मनमाड-इंदोर रेल्वेमार्गाचाच भाग आहे असे सांगून आता आपल्यावर मनोरुग्णाचे उपचार करायचे बाकी आहेत. असे सातत्याने सुचवीत होते. पण अण्णासाहेब अशी एकच व्यक्ती होती की, त्यांच्या लबाडीला, निष्क्रियतेला व खोट्या बोलण्याला सुईच्या कणा इतकी किंमत दिली नाही.
वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार अण्णासाहेबांनी कुठेहि काही बातमी प्रसिध्द होणार नाही. शब्दाने वाच्यता होता कामा नये याची कमालीची गुप्तता पाळूनमनमाड-मालेगाव-धुळे-इंदोर रेल्वे मार्गाचा एक-एक टप्पा पार करीत मनमाड- इंदोर रेल्वे मार्गाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढलाच ! मनमाड-इंदोर रेल्वेमार्गास घटनाकार भारतरत्न, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिली म्हणजे 6 डिसेंबर 2023 रोजी प्राथमिक मंजूरी मिळाली. आता आमच्या सर्व घटनाप्रेर्मीना व दलीत बांधवांना व माता भगिनींना महू येथे जयंतीला-दसऱ्याला नागपूरला व महापरिनिर्वाणदिनी दादरला चैत्यभूमीला आरामात जाता येईल. डॉ बाबासाहेब आंबेडकराच्या जीवनाचा सुवर्ण त्रिकोण निर्माण होईल. महामानवाच्या चरणी आले एवढं योगदान दिल्याचे भाग्य अण्णा साहेबांच्या वाट्याला आले असेही मा. अण्णा साहेबाना पुण्य मिळण्याच भाग्य आले असल्याची भावना मा. व्यक्त केल्या आहेत. महू या जन्मस्थळी दि14 एप्रिल रोजी जाण्यापासून देशातील कुठलीही शक्ती रोखू शकणार नाही. याचे आपणास आजन्म समाधान लाभेल । अशी नम प्रतिक्रियाहि त्यांनी व्यक्त केली. सदर रेल्वे मार्गाच्या निर्मितीमुळे धुळे जिल्ह्यात मोठ-मोठे प्रकल्प येवून लक्षावधी बेरोजगारांच्या रिकाम्या हातांना काम मिळेल. मागासलेला अविकसीत जिल्हा म्हणून लागलेला शिक्का पुसला जाईल । म्हणजे जाईलच.