मयत अक्षय च्या कुटुंबियांना मंत्रीमहोदय अनिल दादांकडून मदतीचा हात.

अमळनेर/ प्रतिनिधी. पोलिस भरती वेळी मयत झालेल्या काल. अक्षय च्या परिवारास मदत, पुनर्वसन व आपत्ती मंत्री मा. अनिल दादा पाटील यांनी आज संध्याकाळी प्रबुद्ध कॉलनी या त्याच्या राहत्या घरी ६-३० वा.सांत्वनपर भेट देऊन सर्व परिस्थिती ची माहिती घेऊन झालेला प्रकार अतिशय वाईट असल्याचे सांगून मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवून देण्याचे आश्वासन देऊन कळवा येथील हॉस्पिटल ची चौकशी होणार असल्याचे सांगितले.कुटुंबियांची परिस्थिती पाहता शासनाची मदत पुढे मिळेलच मात्र आता स्वतः त्यांच्याकडून मयताच्या परिवारास *१०००००/-(एक लाख रुपये)* आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले.
या वेळी पत्रकार संघांचे अध्यक्ष श्री. चेतन राजपूत, ऍड. ब्रम्हे नाना, दत्ता संदानशिव दिनेश बिऱ्हाडे,सोमचंद संदानशिव,भानुदास कांबळे,देवेन्द्र कांबळे व प्रबुद्ध कॉलनीतील रहिवाशी आणि पोलीस भरतीतील मित्र परिवार उपस्थित होता.