पावसाचे जोरदार कमबॅक; भोगवाती नदीला मोठा पूर..

दोंडाईचा प्रतिनिधी /रईस शेख
दोंडाईचात रात्री जोरदार कमबॅक केले आहे. निम्मा भोगावती नदीला मोठा पूर आला. त्या भोगावती नदीतही पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. सर्वत्र पावसाच्या आगमन झाल्याने नागरिक सुखावले आहेत. दोंडाईचा परिसरात पाऊस सुरू असल्याने भोगावती नदीला हंगामातील मोठा पूर आला आहे.
भोगावती आणि तिन्ही मोठ्या नदीतून पाण्याचा विसर्ग सुरू झाला. भोगावती नदीला यंदाच्या हंगामातील मोठा पूर आला आहे. या पूर पाण्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून अमरावती नदीला आलेल्या पुरामुळे नदीच्या पाणीसाठ्यातही वाढ झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
भोगावती अमरावती आणि लेंडुर नदीला आलेल्या पुरामुळे या नदीवरील अनेक लहान-मोठे पूल पाण्यात गेले आहेत. हा पूर पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. मालपूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे अमरावती नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. भोगावती नदीवरील छोटे पूल पाण्याखाली गेले आहेत. खूप वर्षानंतर एवढा मोठा पूर आल्याने नागरिकांनी पूर बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती.पावसाचा जोर सुरू राहिल्यास पाण्याचा विसर्ग परिसरातील लक्षणीय वाढ होण्याची चिन्हे दिसला.