शरद पवारांचा शब्द पूर्ण करण्यासाठी आमचे पुरेपूर प्रयत्न. -माजी आमदार डॉ. बी एस पाटील.

अमळनेर :- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे अनेक उमेदवारांनी आपली इच्छा व्यक्त केली असून हे महाविकास आघाडीने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच सोडावी हा आमचा आग्रह आहे आणि शरद पवारच उमेदवार ठरवतील त्यांचा शब्द पूर्ण करण्यासाठी आमचे पुरेपूर प्रयत्न असतील असे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ बी एस पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मंत्री अनिल पाटील यांचे ने नाव न घेता अप्रत्यक्ष त्यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की कोण मंत्री आहे ? काय घोषणा केल्या ? ही सर्व जुमलेबाजी आहे प्रशासकीय मान्यता मिळाली म्हणजे निधी मिळाला असा अर्थ होत नाही. मंत्र्यांनी घोषणा केलेले कोणते काम पूर्ण केले नुकत्याच निधी जाहीर झालेल्या यादीत पाडळसरे चे नाव का नाही याचा शोध घेतला पाहिजे असेही ते म्हणाले. मी स्वतः डॉ बी एस पाटील, तिलोत्तमा पाटील, सचिन पाटील, प्रशांत निकम, उमेश पाटील इच्छुक आहेत असे त्यांनी सांगितले. मात्र साहेबराव पाटील नेमके कोणत्या गटाचे ते कळत नसून त्यांच्या उमेदवारीबाबत अजून काहीही इच्छा त्यांनी आमच्याकडे कळविलेली नाही मात्र ते आमच्यात आले तर त्यांचे स्वागतच आहेअसेही त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पाटील यांनी सांगितले की बाजार समिती सभापती निवडणुकीत मंत्री यांनी कार्यकर्त्यांसह मतदारांना फसवले आहे. एकही आमसभा घेतली नाही , अवैध व्यवसाय चालक त्यांच्यामागे फिरत आहेत.
यावेळी शहराध्यक्ष श्याम पाटील यांनी आरोप केला की काही प्रवर्गाला लाभ होण्यासाठीच मंत्री काम करतात. शेतकऱ्यांना चुटे भुटे म्हणणाऱ्यांना मतदार निवडून देणार नाहीत. यावेळी तिलोत्तमा पाटील यांनी उमेदवारि राष्ट्रवादी काँग्रेसला मिळण्यासाठीच आमची मागणी आहे, मात्र आघाडीचा धर्म पाळला जाईल असेही त्या म्हणाल्या. पत्रकार परिषदेस ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, जिल्हा सरचिटणीस डॉ किरण पाटील, योजना पाटील, हजर होते.