श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी कावड यात्रेचे आयोजन

अमळनेर/प्रतिनिधी. श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान चे अध्यक्ष सुभाष चौधरी यांच्या संकल्पनेतून बारा वर्षांपूर्वी कावड यात्रेत सुरुवात झाली शिवभक्तांच्या कावड यात्रेस आज यात्रेचे स्वरूप आलेले आहे. दरवर्षी शिवभक्त श्री वर्णेश्वर महादेव मंदिर अमळनेर येथून वाहनाने जळोद येथे बुधगाव च्या बाजूस तापी नदीत उतरतात तेथे विधीवत पूजा करून कावडीत आलेल्या पात्रात जल घेऊन पायी प्रस्थान करतात. हजारो शिवभक्त वाजंत्री च्या तालावर नाचत गाजत अमळनेर कडे प्रस्थान करतात. रस्त्यावर अनेक शिवभक्त नाश्ता जेवणाची चहा पाण्याचीव्यवस्था. करतात शहरातील व तालुक्यातील व बाहेरगावहून आलेले शेकडो शिवभक्त कावड यात्री शिवभक्तांना भेटावयास येतात तेही पाणी बिस्कीट वगैरे आणत असतात. या कावड यात्रेत सिद्धेश्वर महादेव मंदिर संस्थान साने नगर. श्रीराम मंदिर संस्थान नंदगाव हरेश्वर महादेव मंदिर रडावंन राजोरे. पुष्कर महादेव मंदिर व निरंजन महादेव मंदिर गांधली महादेव मंदिर टाकरखेडा नागेश्वर महादेव मंदिर जळोद ओंकारेश्वर महादेव मंदिर फरशीरोड अमळनेर. ओंकारेश्वर महादेव मंदिर व जुने महादेव मंदिर अमळगाव. महादेव मंदिर टाकरखेडा नीलकंठेश्वर महादेव मंदिर सुंदरपट्टी इत्यादी गावातून शिवभक्त मोठ्या प्रमाणावर कावड यात्रेतसहभागी होतात. आताही श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी पाच ऑगस्ट सोमवार रोजी कावड यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणावर कावड यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन महादेव मंदिर ट्रस्ट यांच्यातर्फे करण्यात आलेले आहे..!
💐💐💐💐💐💐💐💐