अमळनेर येथे अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त अभिवादन..

0

अंमळनेर/प्रतिनिधी

अमळनेर– दिनांक 1 ऑगस्ट रोजी, महान साहित्यिक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने, धुळे रोडवरील अण्णाभाऊ साठे स्मारकाला भेट देऊन नामदार अनिल पाटील यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले.
अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. एक प्रतिभावंत साहित्यिक म्हणून अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून गोरगरीब आणि उपेक्षित वर्गाची दुःखे खूपच वास्तववादी पद्धतीने मांडली होती. त्यांनी विविध साहित्य प्रकार हाताळले असून, विशेषतः त्यांच्या कादंबऱ्यांचे देशातील तसेच परदेशातील विविध भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत.
अशा या महापुरुषाची 104 वी जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी नगरसेवक विक्रांत पाटील,सोमा चंदनशिव,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे किशोर रायसकडा,तालुकाध्यक्ष समाधान मैराळे,विजय गाडे,प्रवीण बैसाणे,हरीचंद्र कढरे, नारायण गांगुर्डे, सुरेश कांबळे,नूर खान,जितू कढरे सह विविध मान्यवर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!