दोंडाईचात ११११ फुट ध्वजासह तिरंगा यात्रा काढण्यात आली

0

दोंडाईचा प्रतिनिधी रईस शेख

शहरातील भारतीय जनता पार्टीचे आमदार जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतून ११११ फूट लांबीच्या तिरंगा ध्वजाच्या प्रतिकृतीची रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांसह महाविद्यालयीन तरुण तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या दरम्यान अखंड हिंदुस्तानच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच तिरंगा रॅली काढण्यात आली.

दोंडाईचा येथील शनि मंदिरापासून या तिरंगा रैली सुरुवात करण्यात आली. ही रॅली भारतीय जनता पार्टीचे आमदार जयकुमार भाऊ यांच्या संकल्पनेतून काढण्यात आली. तर भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन मराठे यांनी या रॅलीचे नियोजन केले. रॅलीमध्ये शेकडो विद्यायांनी देखील सहभाग नोंदवला. विशेषता ११११ फूट लांबीच्या तिरंगा राष्ट्रध्वजाच्या प्रतिकृतीची मिरवणूक काढण्यात आली. आमदार जयकुमार रावल, मुख्याध्याधिकारी देवेंद्रसिंग परदेशी, अपर तहसीलदार संभाजी पाटील, पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, या अधिकाऱ्यांसह भारतीय जनता पार्टीचे , दोंडाईचा शहर अध्यक्ष प्रविण महाजन, माजी नगराध्यक्ष नाबु पिंजारी, विजुभाऊ मराठे, माजी बांधकाम सभापती निखिल जाधव, चिरंजीव चौधरी, पंकज चौधरी, संजय अग्रवाल, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व विध्यार्थी या रॅलीत सहभागी झाले. डीजेच्या देशभक्तीपर गीतांच्या सुरांमध्ये सूर मिळवत रॅलीतील सहभागी प्रत्येक व्यक्तीने भारत माता की जय आणि वंदे मातरम च्या घोषणा देत ही तिरंगा रॅली देण्यात आली. तसेच रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी देखील भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. त्यामुळे देशभक्तीपर वातावरण तयार झाले.

या रॅलीचे विशेष आकर्षण म्हणजे नागरिकांची व विद्यार्थीची मोठ्या संख्येने यांनी देखील सहभाग नोंदवला. दरम्यान या रॅली संदर्भात प्रतिक्रिया देताना भाजपाचे आमदार जयकुमार रावल यांनी सांगितले की अखंड हिंदुस्तानच्या पार्श्वभूमीवर आपण भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच ही रॅली काढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!