लाडकी बहीण’साठी आधार कार्ड बँकशी लिंक करा

24 प्राईम न्यूज 16 Aug 2024. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत १ कोटी ६२ लाख महिलांनी नोंदणी केली आहे. अर्ज केलेल्या प्रत्येक पात्र महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र ज्या पात्र महिलांचे आधार कार्ड बँकेशी लिंक नाही, त्या महिलांचे आधार कार्ड बँकेशी लिंक करून घेण्याची सूचना जिल्हा अधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांना केल्याचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ देण्याची प्रक्रिया १४ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. आतापर्यंत राज्यात ८० लाख महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्यांच्या लाभाची रक्कम तीन हजार रुपये जमा करण्यात आली आहे. उर्वरित पात्र महिलांना शनिवार १७ ऑगस्टपर्यंत हा लाभ मिळणार आहे.