शनिवारी खासदार सुप्रिया सुळे अमळनेरात.

अमळनेर/प्रतिनिधी
शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे या अमळनेर विधानसभा मतदार संघातील महिला ,विद्यार्थी ,शेतकरी ,कष्टकरी – व्यवसायिक यांच्याशी संवाद साधण्यासाठी शनिवार१७ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ४ वाजता अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे येत असून यावेळी त्यांच्या सोबत जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, पालकमंत्री सतिष पाटील, गुलाबराव देवकर, रविंद्र भैया पाटील, महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी हे देखील उपस्थित राहणार असून अमळनेर विधानसभा मतदार संघातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे विनंतीपर आवाहन अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.