आज देशभरातील खासगी, सरकारी रुग्णालयांचा बंद.

आबिद शेख/अमळनेर
कोलकात्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनीची बलात्कारानंतर हत्या करण्यात आल्याच्या संतप्त घटनेच्या निषेधार्थ आज शनिवारी संपूर्ण देशभरातील खासगी आणि सरकारी रुग्णालये बंद असणार आहेत. तातडीच्या सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद राहणार असल्याने रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) केलेल्या आवाहनानंतर देशभरातील खासगी, सरकारी रुग्णालयांनी तातडीची सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रियाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आर. व्ही. अशोकन यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.