अनुदानित आश्रम शाळा पिंपळे बु.येथे स्वतंत्र दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

आबिद शेख/अमळनेर. चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा पिंपळे बुद्रुक येथे 78 व स्वतंत्र दिवस उत्साहात साजरा करण्यात आला, हर घर तिरंगा या अभियानांतर्गत आश्रम शाळेत दि.13 ऑगस्ट रोजी एनएसजी कमांडो श्री हरिश्चंद्र सैंदाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, दि.14 ऑगस्ट रोजी एक्स आर्मी मॅन श्री धनराज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, व दि.15ऑगस्ट संस्थेचे सचिव नानासाहेब श्री युवराज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून संस्कृतीक कार्यक्रम, तसेच आदिवासी संस्कृती यावर आधारित नाटिका व नृत्य सादर करण्यात आले, सदर कार्यक्रमासाठी 600 पालक उपस्थित होते, तसेच संस्थेचे अध्यक्ष विद्याताई पाटील, सचिव नानासाहेब श्री युवराज पाटील, संचालक श्री अभिजीत पाटील, रश्मी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक प्राथमिक विभाग, माध्यमिक विभाग, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले