दोंडाईचात कोलकातातील घटनेचा जाहीर निषेध…अपर तहसीलदार संभाजी पाटील यांना निवेदन देण्यात आला.

दोंडाईचा प्रतिनिधी /रईस शेख
पश्चिम बंगाल मधील कोलकाता येथील आरजीकार वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरण दोंडाईचा येथे जाहीर निषेध केला. या घटनेच्या निषेधार्त इंडियन मेडिकल असोसिएशन दोंडाईचा यांच्या वतीने निषेध केला.
याबाबत अपर तहसिलदार संभाजी पाटील यांना निवेदन देवून आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी. अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशन,आयुष डॉक्टर असोसिएशन,दोंडाईचा डॉक्टर्स असोसिएशन, दोंडाईचा डेंटल असोसिएशन यांच्या कडून जाहीर निषेध करण्यात आली.
याप्रसंगी दोंडाईचा इंडियन मेडिकल असोसिएशन अध्यक्ष डॉ. निलेशकुमार पवार, उपाध्यक्ष डॉ. आशाताई टोंणगावकर, खजिनदार डॉ.ओमप्रकाश अग्रवाल, सचिव डॉ. दिलीप पाटील, डॉ. जितेंद्र देशमुख, डॉ.हेमंत नागरे, डॉ.संतोष आव्हाड, डॉ.सोनल पारख, डॉ.बी एल जैन, डॉ. एस जी सोनवणे, डॉ.शंकर अग्रवाल, डॉ.मंजुलता अग्रवाल, डॉ.राजेश टोंणगावकर, डॉ.ज्योत्स्ना टोंणगावकर, डॉ.चेतन बच्छाव, डॉ.अर्चना पाटील, डॉ.दिपाली नागरे, डॉ.हेमराज पाटील, डॉ.जयश्री पाटील, डॉ.पुरुषोत्तम भावसार, डॉ.सचिन पारख, डॉ.नेहा पारख डॉ.प्रफुल्ल जैन, डॉ.पूनम जैन, डॉ.जयेश ठाकूर, डॉ.चेतन पाटील, डॉ.अमोल भामरे, डॉ.ललितकुमार चंद्रे, डॉ.गणेश खैरनार, डॉ.लक्ष्मीकांत साठे, डॉ.अनिकेत पाटील, डॉ अनिल धनगर, डॉ राजेंद्र पाटील, प्रविण महाजन, माजी नगराध्यक्ष रवी उपाध्ये, माजी नगरसेवक रवी जाधव, जगदीश पाटील, आदी उपस्थित होते.