अमळनेर येथे कोलकातातील घटनेचा जाहीर निषेध… प्रांाधिकारी यांना दिले निवेदन.

आबिद शेख/अमळनेर पश्चिम बंगाल मधील कोलकाता येथील आरजीकार वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी अमळनेर येथे या घटनेच्या निषेधार्त इंडियन मेडिकल असोसिएशन अमळनेर यांच्या वतीने निषेध करत प्रांाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. पच्छिम बंगालमधील कोलकत्ता येथील S.R.KAR HOSPITAL च्या डॉक्टर मोमिता देबनाथ या स्वतःची डयुटी संपवून रात्री आराम करत असतांना त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करुन नंतर हत्या करण्यात आली आहे. आम्ही अमळनेर तालुक्यातील डॉक्टर्स या घटनेचा तीव्र निषेध करतो. या प्रकरणातील सर्व आरोपींना लवकरात लवकर पकडून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करत आहोत. तसेच डॉक्टरांना हॉस्पीटल मध्ये काम करतांना कुठलीही भिती वाटली नाही पाहिजे या पध्दतीचे कठोर कायदे शासनाने आणावेत व देशातील सर्वच डॉक्टर महिलांच्या सुरक्षे संदर्भातील उपाय योजना कठोर करण्यात याव्यात अशी मागणी करत आहोत.