डॉक्टरांवर हल्ला झाल्यास आता २४ तासांत एफआयआर.

24 प्राईम न्यूज 18 Aug 2024.
डॉक्टरांवर हल्ला झाल्यास आता २४ तासांमध्ये एफआयआर दाखल होणार आहे. डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भात केंद्र सरकारकडून नुकताच हा मोठा निर्णय घेण्यात आला असून यासंदर्भात आरोग्य संस्थांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांनुसार डॉक्टरांवर हल्ला किंवा त्यांच्यासोबत हिंसाचार झाल्यास २४ तासांच्या आत एफआयआर दाखल करावा लागेल. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व आरोग्य संस्थांना मेमो पाठवला आहे. तसेच डॉक्टरांवर हिंसाचार झाल्यास घटनेच्या सहा तासांच्या आत एफआयआर दाखल करण्यात यावा. ही जबाबदारी संस्थाप्रमुखांची असेल, असेही मार्गदर्शक सूचनेत सांगण्यात आले आहे. कोलकात्यातील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनीची बलात्कार करून हत्या करण्यात आल्याच्या प्रकारानंतर तसेच या वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांवर हल्ले करण्यात आल्याच्या घटनांनंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट असताना केंद्र सरकारने डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.