महंत रामगिरी महाराजांविरुद्ध दोंडाईचात गुन्हे दाखल; -जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्य भोवली

दोंडाईचा प्रतिनिधी /रईस शेख
सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिकमधील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनादरम्यान प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. याप्रकरणी रामगिरी महाराज यांच्यावर दोंडाईचा शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ आता दोंडाईचा पोलीस ठाण्यातही रामगिरी महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी एका धर्माबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता याप्रकरणी महंत रामगिरी महाराज, सद्गगुरु गंगागिरी महाराज यांच्याविरोधात दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तसेच मुस्लिम धर्माविरुद्ध वादग्रस्त, बेछूट आणि बेताल वक्तव्य करून जाणीवपूर्वक, हेतुपरस्परपणे समाजात तेढ निर्माण करून, जातीय दंगल घडविणे, मान्यष्यहानी व वित्तहानी करण्याच्या उद्देशाने, बेकायदेशीररीत्या राष्ट्रीय एकात्मतेला बाधक व कायदा सुव्यवस्था निर्माण होईल, असे वक्तव्य केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे.
आसिफ रज्जाक पिंजारी रा मल्टी पर्पज हायस्कूल जवळ, दोंडाईचा जि. धुळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता (बी.एन.एस)2023 चे कलम 192, 196, 197, 299, 302, 353 (2), 356 (3), 356 (2) प्रमाणे महंत रामगिरी महाराज उर्फ श्री गंगागिरी महाराज यांच्यावर दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,