रोटरी क्लब, अमळनेर तर्फे रेल्वेच्या २००० गरजू प्रवाशांची अन्न व पाण्याची सोय.

आबिद शेख/अमळनेर
गुजरात येथे बहुतेक ठिकाणी अत्रिवृष्टी मुळे गुजरात मध्ये रेल्वे सेवा विस्कळित झाल्यामुळे,
ता.२८/०८/२०२४ रोजी अमळनेर रेल्वे स्थानकावर
बराऊनी-अहमदाबाद एक्स्प्रेस ला ५ तासानं साठी अमळनेर स्थानकावर थांबून राहावे लागले,
यात लहान मूल, वृध्द महिला प्रवासी व कामगार वर्ग असे १५००-२००० प्रवासी असताना यांचे जेवणाचे हाल होतायेत असे CMI पांडे साहेब यांना कळल्यास, त्यांनी रोटरियन व रेल्वे स्थानिक सलागर समिती चे रो. प्रित्पाल बग्गा यांना कळवले असता, प्रवाशांची गैरसोय व हाल बघता रोटरी ची तत्काळ मीटिंग बोलावन सुमारे २००० प्रवाशांसाठी अन्न व RO पाण्याची सोय करण्यात आली.
सदर वाटप व व्यवस्थेसाठी रोटरी प्रेसिडेंट ताहा बुकवाला,रोटरी मेंबर सुहास राणे, चेलाराम सेनानी,रोहित संघवी,सौरभ जैन,वृशब पारख,किशोर लुल्ला,ईश्वर सेनानी, रौनक संकलेचा,प्रतीक जैन असे सदस्य यांनी परिश्रम घेतले व
स्टेशन अधीक्षक शिंदे साहेब, स्टेशन ट्रॅफिक निरीक्षक सिंह साहेब व RPF स्टाफ, लाईनमन स्टाफ व काही इतर जुने रेल्वे कमिटी मेंबर यांनी देखील वाटप व व्यवस्थेसाठी मदत करून, रेल्वे ला आणि गरजू प्रसावस्याना होत असलेली रोटरी ची मदत कौतुकास्पद असल्यास समाधान व्यक्त केले व प्रवाशांची सोय झाल्याचा समाधान त्यांच्या मार्फत व्यक्त झाल्यास, रोटरी प्रेसिडेंट रो.ताहा बुकवाला यांनी रोटरी मार्फत अश्या सेवा होत असल्याचा समाधान असतो असे कळवून रेल्वे प्रशासन व स्टाफच्या मदतीसाठी आभार मानले..