धार येथे तलावात पोहायला गेलेल्या एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू .

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर तालुक्यातील कंडारी येथील जयेश भरत देसले हा विद्यार्थी मारवड येथे भालेराव रामभाऊ पाटील ज्युनिअर कॉलेजला शिक्षण घेत होता. यावर्षी तो 12 वर्गात प्रवेशित असून प्रताप महाविद्यालयात प्रताप पॅटर्नला देखील JEE व NEET या परीक्षांची देखील तयारी करीत होता. आज दुपारी तो अमळनेर तालुक्यातील धार येथील तलावात मित्रांसोबत पोहायला गेला होता…. मित्र थोडक्यात बचावले व ते बाहेर देखील निघाले होते. मात्र जयेश जास्त पाणी असल्याने तेथेच बुडाला असता, त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संध्याकाळी विद्यार्थ्याला बाहेर काढण्यास मारवड पोलीस व स्थानिकांना यश आले.मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील लोकांनी गर्दी केली होती.