ज्युनिअर राज्यस्तरीय सेपक टकारॉ निवड चाचणी..

24 प्राईम न्यूज 9 Jan 2024. २५ वी महाराष्ट्र राज्य सेपक टकरॉ स्पर्धा (मुले व मुली) वर्धा येथे १७ ते १९ जानेवारी २०२५ च्या दरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे.
सदर स्पर्धेत जळगाव जिल्हयाचे मुले व मुली दोन्ही संघ सहभागी होणार आहे.
जिल्हा संघ निवड चाचणी गुरुवारी दि. ०९/०१/२०२५ संध्याकाळी ५:०० वाजता अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, प्रताप नगर, जळगाव या शाळेच्या क्रीडांगणावर ठेवण्यात आलेली आहे. ज्या खेळाडूंना सदर स्पर्धेत सहभागी व्हायचा आहे त्यांनी श्री. ईकबाल मिर्झा ९३७००००६६२, प्रा. वसीम मिर्झा ९९२३१७२९९५ व आसिफ मिर्झा ९०२१२२३४५२ यांच्याशी संपर्क करावा. सदर
स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावं असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष एजाज मलिक, प्रा. चंद्रकांत सोनवणे, डॉ. प्रदीप तळवेलकर, इक्बाल मिर्झा,प्रशांत जगताप व प्रा वसीम मिर्झा यांनी केलेले आहे .
निवड चाचणी साठी येणाऱ्या सर्व खेळाडूंनी आपल्या सोबत आधार कार्ड व २ पासपोर्ट फोटो घेऊन यावें.