एसटी बसच्या धडकेत महिला ठार, पती गंभीर जखमी..

0

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर शहरातील धुळे रस्त्यावर सेंट मेरी हायस्कूलजवळ काल (21 जानेवारी) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात खडके, तालुका अमळनेर येथील महिलेचा जागीच मृत्यू झाला असून तिचा पती गंभीर जखमी झाला आहे मृत महिलेचे नाव अरुणाबाई समाधान राजपूत (वय 49) असे आहे. त्या व त्यांचे पती समाधान रुपसिंग राजपूत (रा. खडके) दुचाकीवरून अमळनेरहून खडके गावाकडे जात होते. यावेळी समोरून येणाऱ्या कल्याण-रावेर एसटी बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत अरुणाबाई राजपूत जागीच ठार झाल्या, तर त्यांचे पती गंभीर जखमी झाले समाधान राजपूत यांना तत्काळ उपचारासाठी डॉ. अनिल शिंदे यांच्या नर्मदा मेडिकल फाउंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि नंतर पोलिस ठाण्यात जाऊन एसटी बस चालकाविरोधात तक्रार दाखल केली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!