अमळनेर येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी…

आबिद शेख/अमळनेर
शहरातील कोर्ट परिसरात असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी पाडळसरे धरण समितीचे अध्यक्ष सुभाष अण्णा चौधरी व शिवसेना तालुका प्रमुख प्रथमेश पवार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला उपजिल्हा प्रमुख महेश देशमुख, शहर संघटक साखरलाल महाजन, धर्मवीर सेनेचे बहिरम सर, युवासेना शहर प्रमुख भरत पवार, उपशहर प्रमुख प्रवीण पाटील, गुणवंत पाटील, आरोग्य सेवक प्रमोद शिंपी तसेच शिवसैनिक करण जाधव, भैया भाऊ, प्रीतम पाटील, पंकज पाटील, पांडू भाऊ भोई उपस्थित होते.
जयंतीनिमित्त बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि संघटनेला अधिक बळकट करण्याचा निर्धार शिवसैनिकांनी व्यक्त केला. कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला.