भूमापन अधिकारी भास्कर गंगाधर १०,०००/- रुपये लाच घेताना रंगेहात पकडले…

नगर भूमापन कार्यालयातील गैरप्रकार; सेवानिवृत्त अधिकाऱ्याची तक्रार
24 प्राईम न्यूज 24 Jan 2025. धुळे तक्रारदार हे नगर भूमापन अधिकारी या पदावरून सन २०१४ मध्ये धुळे येथून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी आपल्या पत्नीच्या नावे मौजे महिंदळे, स.नं. १२८/२, प्लॉट नं. २, क्षेत्र १५५ चौ.मी. असलेली संपत्ती दि. २३.१२.२०२४ रोजी खरेदी केली होती. मात्र, संबंधित मिळकत पत्रिकेत या प्लॉटचे क्षेत्र चुकीने १८५.२० चौ.मी. इतके दाखल झाले.
या चुकीमुळे तक्रारदारांना त्यांच्या खरेदीखताच्या आधारे मिळकत पत्रिकेवर नाव नोंदवण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे मूळ मालकाने नगर भूमापन अधिकारी, धुळे यांच्याकडे पत्रिकेवरील क्षेत्र दुरुस्तीसाठी अर्ज केला. अर्जावर कार्यवाही करताना नगर भूमापन अधिकारी भास्कर वाघमोडे यांनी चुकीचे क्षेत्र दुरुस्त करण्याचा आदेश काढला. मात्र, आदेश असूनही दुरुस्ती झाली नाही.
तक्रारदाराने वेळोवेळी धुळे नगर भूमापन कार्यालयात जाऊन अधिकारी वाघमोडे व परिरक्षण भूमापक हर्षल खोंडे यांच्याकडे पाठपुरावा केला. यादरम्यान, वाघमोडे यांनी तक्रारदाराकडून कामासाठी १०,०००/- रुपये घेतल्याचा आरोप आहे.
या गैरप्रकाराबाबत तक्रारदारांनी संबंधित उच्च अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असून, मिळकत पत्रिकेतील दुरुस्ती व अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.