प्रजासत्ताक दिनाच्या संध्येला नाविन्य प्रतिष्ठानतर्फे जाहीर व्याख्यानाचे आयोजन..

आबिद शेख/अमळनेर
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नाविन्य प्रतिष्ठानतर्फे पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल येथे सायंकाळी ६ वाजता “सुखी व्हायचंय – ऐका जपानी कला” या विषयावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. बी.एस. पाटील हे या व्याख्यानात मार्गदर्शन करणार आहेत.
नाविन्य प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जपानी तत्त्वज्ञानावर आधारित या व्याख्यानातून जीवनात शाश्वत सुख मिळवण्याचे मार्गदर्शन मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या संध्याकाळी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी नागरिकांनी उपस्थित राहून या प्रेरणादायी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानचे पदाधिकारी करत आहेत.