शिक्षक मिलिंद पाटील ग्रामगौर व आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित….

आबिद शेख/अमळनेर. व्हाईस ऑफ मीडियाचे ज्येष्ठ पत्रकार, सल्लागार, तसेच लोंढवे विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक माननीय मिलिंद पाटील सर यांना ग्रामगौरव आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा सन्मान माजी आमदार आबासाहेब डॉ. बी.एस. पाटील, ज्येष्ठ नागरिक नीळकंठ पाटील आणि मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेले भरीव योगदान, विद्यार्थी घडवण्याच्या त्यांच्या उत्कृष्ट कार्यपद्धती, याची दखल घेत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.
माननीय मिलिंद पाटील सर यांच्या या यशाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!