एमपीडीएतून मुक्त झालेल्या आरोपीवर बाजार समितीत हल्ला, गंभीर जखमी

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर – एमपीडीए कारवाईतून सुटून आलेल्या विशाल दशरथ चौधरी याच्यावर सात ते आठ जणांनी लाठ्या-काठ्यांनी हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना बाजार समितीच्या आवारात घडली.
विशाल चौधरी हा १ फेब्रुवारी रोजी एमपीडीए कारवाईतून सुटून आला होता. ३ फेब्रुवारी रोजी तो बाजार समितीच्या आवारात कामासाठी गेल्यावर काहींनी अचानक हल्ला केला. या मारहाणीत त्याच्या डोक्याला तीन ठिकाणी गंभीर जखमा झाल्या असून त्याला तातडीने धुळ्यात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. जखमीच्या जबाबानंतर गुन्हा दाखल करून कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी दिली.