पाळधी जळीतग्रस्त दुकानदारांना एकता संघटनेचा मदतीचा हात – . – ५ लाखांची आर्थिक मदत वितरित…

24 प्राईम न्यूज 4 Feb 2025. पाळधी येथे ३१ डिसेंबर रोजी झालेल्या दंगलसदृश घटनेत अल्पसंख्याक समाजाच्या २५ दुकानांची लूट आणि जाळपोळ झाली होती. नुकसानग्रस्त दुकानदारांना शासकीय भरपाई मिळवून देण्यासाठी एकता संघटनेने त्यांच्या सोबत आंदोलन, साखळी उपोषण आणि शासन दरबारी पाठपुरावा सुरू ठेवला आहे.
मात्र, रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर मदतीसाठी विलंब होत असल्याने, एकता संघटनेने सामाजिक उत्तरदायित्व म्हणून ५ लाख रुपयांची तातडीची मदत जळीतग्रस्त दुकानदारांना वितरित केली. या निधीचे वाटप दुकानदारांच्या नुकसानीनुसार आणि आपसातील समझोत्यानुसार करण्यात आले.
याआधी, घटनेनंतर तिसऱ्याच दिवशी जळगाव जिल्हा मुस्लिम मन्यार बिरादरीने देखील १ लाख रुपयांची मदत दिली होती.
पाळधी येथे प्रत्यक्ष जाऊन एकता संघटनेचे समन्वयक फारूक शेख, संघटक नदीम मलिक आणि कार्यकारी संचालक आरिफ देशमुख यांच्या हस्ते ही मदत वितरित करण्यात आली. यावेळी संघटनेचे अनिस शाह, मजहर पठाण, मतीन पटेल, युसुफ खान, कासिम उमर, सैयद इरफान, नजमोद्दिन शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.