ग्रामीण समस्यांना वाचा फोडणाऱ्या ‘रक्षणबंधन’ लघुपटाचा शुभारंभ.                                     -अनिल कुमार गायकवाड : “चित्रपटाच्या माध्यमातून ग्रामीण प्रश्नांना न्याय मिळाला पाहिजे”

0

आबिद शेख/अमळनेर. – ग्रामीण भागातील समस्या प्रभावीपणे मांडण्यासाठी सोशल मीडिया व चित्रपट हे महत्त्वाचे माध्यम ठरू शकतात. त्यामुळे अशा समस्यांना न्याय मिळावा, असे मत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांनी व्यक्त केले.

माहीम येथे आयोजित ‘रक्षणबंधन’ या लघुपटाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमात चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. अनिल कुमार गायकवाड यांनी सांगितले की, ग्रामीण व आदिवासी भागातील समस्या गंभीर असून त्यावर सरकारसोबतच समाजसेवी संस्थांनीही लक्ष द्यायला हवे. त्यांच्या नावाने एक सामाजिक संस्था महाराष्ट्रभर कार्यरत असून, शिक्षण, आरोग्य व पर्यावरणासह पाच सूत्री कार्यक्रम राबवले जात आहेत.

पर्यावरण संवर्धन उपक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील दहा गावांमध्ये वृक्षारोपण व संगोपन करणाऱ्या कुटुंबांचा सन्मान केला जाणार आहे. विशेषतः महिलांना साडीचोळी देऊन त्यांच्या योगदानाची दखल घेतली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भविष्यात राजकारणात जाण्याचा निर्णय घेतलेला नसल्याचे सांगतानाच, चित्रपटात एखादी भूमिका साकारण्याची इच्छा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

‘रक्षणबंधन’ लघुपटाचे निर्माता व ज्येष्ठ समाजसेवक के. रवी दादा यांनी या चित्रपटातून समाजाला प्रभावी संदेश दिला जाणार असल्याची माहिती दिली. तसेच, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) फंडाचा उपयोग आदिवासी पाड्यांच्या विकासासाठी व्हावा, अशी मागणीही त्यांनी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आदिवासी विकासासाठी ठोस योजना राबवाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमास निर्माता-दिग्दर्शक के. रवी दादा, बालकलाकार मनस्वी गायकवाड, रोशनी दुपारगुडे, राजश्री शेंडे, शरद रणपिसे, महादू पवार, राजेश वाळुंज, नईम शेख, माजी पोलीस अधिकारी व समाजसेवक अरविंद पटकुरे, डीआरआयचे माजी संचालक नारायण जाधव, डॉ. रतन पवार, दीपक पडये, रमजान सिद्दिकी आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!